नगर तालुका राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठीशी | पुढारी

नगर तालुका राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठीशी

शशिकांत पवार :

नगर तालुका : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी झाल्यानंतर ग्रामीण भागात देखील कार्यकर्त्यांसमोर मोठा पेच प्रसंग उभा राहिलेला दिसून येतो. नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची स्पष्टोक्ती तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले यांनी दिली. अध्यक्ष कर्डिले म्हणाले, शेतकरी व सर्व सामान्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून शरद पवारांची देशात ओळख आहे. सर्वात मोठी शेतकर्‍यांना कर्जमाफी शरद पवार यांनीच दिली होती.

शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळत होता. त्यांच्याच कार्यकाळात सर्वात जास्त भाव कांद्यालाही मिळाला होता. सदैव शेतकरी व सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. शरद पवारांच्याच कल्पक दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे शेतकरी, र्वसामान्यांच्या हितासाठी नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्णपणे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले यांनी स्पष्ट केले.

Back to top button