कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवारी 624 वाहनाद्वारे कांद्याची व भुसार मालाची मोठी आवक झाली. मात्र, सायंकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने कांद्याचे लिलाव थांबवावे लागले, त्यामुळे दीडशे ते 200 वाहने शेतकर्यांना कांदे झाकून उभी करून ठेवावी लागली. बाजार समिती आज आलेल्या कांद्याचे निम्म्याच्या वर झाले होते. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने लिलाव थांबवावे लागले.
कांद्याला 1678 रुपये कमाल भाव तर 300 रुपये किमान भाव तर 1325 रुपये सर्वसाधारण भाव प्रति क्विंटल मिळाला होता. काल बाजार समितीच्या नोंदीप्रमाणे 12 हजार 480 क्विंटल कांदा आवक झाला आहे. भुसार मालामध्ये विविध धान्यांची आवक झाली होती. मात्र अचानक झालेल्या पाऊस आणि लिलाव ठप्प होऊन वाहने उभी करून ठेवावी लागेल. आता त्या वाहनांतील कांद्यांचा लिलाव गुरुवार आज होतील, असा अंदाज आहे.