नगर : मैत्रेय कंपनी विरोधात गुंतवणूकदार आक्रमक

नगर : मैत्रेय कंपनी विरोधात गुंतवणूकदार आक्रमक

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  मैत्रेय कंपनीने गुंतवणुकीवर अधिक व्याज, दाम दुप्पट आदी अमिषे दाखवून कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्यात नोकरदार, व्यावसायिक शिक्षक व सर्वसामान्य नागरिकांची आयुष्याची जमापुंजी ठेव म्हणून घेतली, मात्र काही दिवसातच या कंपनीने बिर्‍हाड गुंडाळत गुंतवणूकदारांना मोठा धोका दिला. यामुळे अनेकांची फसवणूक झाली, मात्र या कंपनी विरोधात मैत्रेय संघर्ष कृती समिती स्थापन करण्यात आली. आहे. या कृती समितीमार्फत न्यायालयात कंपनी विरोधात याचिका दाखल केली आहे. गुंतवणूकदार आक्रमक झाले आहेत. कंपनीकडील रक्कम परत मिळेपर्यंत मैत्रेय संघर्ष कृती समितीचा लढा सुरुच राहणार असल्याची माहिती कृती समितीचे रामचंद्र ठोंबरे व नंदू तांबट यांनी दिली.

मैत्रेय कंपनीच्या विविध योजनेत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार, एजंट यांनी कंपनी बंद पडल्यामुळे रक्कम परत मिळण्यासाठी कोपरगाव न्यायालयात कंपनीविरोधात याचिका दाखल केली. कृती समितीने कोर्टाच्या कामकाजा बद्दल होणारा अहवाल वेळोवेळी गुंतवणूकदारांची बैठक घेत त्यांच्यासमोर सादर केला आहे. अ‍ॅड. हुसळे कृती समितीच्या बाजूने कायदेशीर बाबींची पूर्तता करीत न्यायालयात केस लढवत आहे. मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या वतीने काही कायदेशीर बाबी पुर्ण करण्यासाठी रविवार (दि. 9 जुलै) रोजी दुपारी 12 वा. येथील मारुती मंदिर, गांधीनगर परिसरात बैठक होणार आहे. यावेळी गुंतवणूकदारांनी योजनेत गुंतवणूक केलेले कागदपत्र सोबत आणावे, असे आवाहन मैत्रेय संघर्ष कृती समितीच्या वतीने रामचंद्र ठोंबरे, नंदू तांबट व उत्तम भालेराव यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news