नगर : विद्युत तारा चोरणारे पाच जण जेरबंद | पुढारी

नगर : विद्युत तारा चोरणारे पाच जण जेरबंद

पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर व वासुंदे परिसरात विद्युत तारांची चोरी करणार्‍या दोन टोळ्या पारनेर पोलिसांनी जेरबंद केल्या आहेत. त्यांच्याकडून 1 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली आहे. टाकळी ढोकेश्वर व वासुंदे या भागात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या टॉवरवरील विद्युत तारांची चोरी करीत असल्याची माहिती पारनेर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक गायकवाड, सहायक निरीक्षक विजय ठाकूर, हवालदार भोसले, गुजर, खेमनर, मोकाटे यांना वासुंदे परिसरात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या. पथकाची गस्त सुरू असताना चार ते पाच व्यक्ती टॉवरवरील तारांची चोरी करीत असल्याचे आढळून आले.

पथकातील कर्मचार्‍यांनी मारूती हौशीराम जाधव (दि.23, रा.तिरडा, ता.अकोले, जि.नगर), सुयोग अशोक दवंगे (वय 19, रा. हिवरगाव पावसा, संगमनेर) व अनिकेत कारभारी शिंदे (वय 21, घोटी, ता.इगतपुरी, जि.नाशिक) या तिघांना जागेवर पकडून 60 हजार रुपये किमतीची 800 मीटर अ‍ॅल्युमिनियम तार व 30 हजार रूपयांचे विद्युत साहित्य, असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
त्यांचे इतर दोन साथीदार पसार झाले असून, पाच जणांविरोधात विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक श्यामसुंदर गुजर करीत आहेत

दुसर्‍या वेळेस गस्त घालत असताना तिघेजण टॉवर वरील विद्युत तारांची चोरी करीत असल्याचे आढळून आले. यातील संतोष दादू दारोळे (रा तास संगमनेर) व जमीर शेख (संगमनेर) यांना जागेवर पकडण्यात आले. त्यांच्याकडून 70 हजार रुपये किमतीच्या अ‍ॅल्युमिनियम तार, 30 हजार रुपयांचे विद्युत साहित्य जप्त करण्यात आले.

हे ही वाचा : 

पृथ्वीला वाचवणार ‘नासा’ची विमाने!

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात, सत्तावीस दिवसांचा अखंड प्रवास

Back to top button