Latest
गणेश कारखाना निवडणूक : विखे पाटलांना धक्का; थोरात, कोल्हे गट आघाडीवर
राहाता(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहता तालुक्यातील श्री गणेश कारखाना निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या गटाने आघाडी घेतली आहे. त्यामुळे विखे गटामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश कारखाना निवडणुकीसाठी राहता येथे मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरी अखेर थोरात, कोल्हे गटाने जवळपास सर्वच मतदारसंघातून आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे सध्यातरी चित्र स्पष्ट आहे.
हेही वाचा

