

कुकाणा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : माळीचिंचोरा (ता. नेवासा) शिवारातील हॉटेल धनश्रीनजीक एसटी बसची मोटरसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटरसायकलवरून जाणार्या माळीचिंचोरा ग्रामपंचायतीच्या सदस्य प्राजक्ता बापूसाहेब धानापुणे (वय 25) यांचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी (दि. 17) माळीचिंचोरा येथील बापूसाहेब लक्ष्मण धानापुणे व त्यांची पत्नी प्राजक्ता बापूसाहेब धानापुणे आपल्या तीनवर्षीय मुलीसह मोटरसायकलवरून (एमएच 17 बीबी 4955) वडाळा बहिरोबा येथे दवाखान्यात जात होते.
दुपारी बाराच्या सुमारास अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील बसथांबा नसलेल्या एका हॉटेलजवळ उभी असलेली एसटी बस (एमएच 14 बीटी 4312) छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी वळत असताना या बसची मोटरसायकलला धडक बसली. या अपघातात ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता धानापुणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती बापूसाहेब धानपुणे व मुलगी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा