कोळपेवाडी : शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा; आ. काळे यांची पोलिस प्रशासनाला सूचना | पुढारी

कोळपेवाडी : शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा; आ. काळे यांची पोलिस प्रशासनाला सूचना

कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरात छोट्या-मोठ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांकडून व्यावसायिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात होणार्‍या चोर्‍या थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून शहराची कायदा सुव्यस्था अबाधित ठेवावी, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी प्रशासनाला दिल्या. कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून होत आहे. अनेक छोट्या मोठ्या चोर्‍यामुळे नागरिक त्रासले आहे.

रात्रीच्या वेळी व्यवसायिकांना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत दाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास ठोंबरे यांची भेट घेतली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी भ्रमणध्वनी वरून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या.

चोर्‍यांचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. त्यामुळे ज्या जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे त्या पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून नागरिकांना कोणत्याही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शहरात विविध भागात हाणामार्‍या होत असल्याच्या घटना घडत आहे. कोरोनाचे दोन वर्ष व्यावसायिकांसाठी अत्यंत अडचणीचे होते.

त्यामुळे सर्वच व्यवसायिक आर्थिक अडचणीत सापडले होते. रात्री दिलेल्या वेळेच्या आत व्यवसाय सुरु ठेवणार्‍या व्यावसायिकांना पोलिसांकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कायदा सुव्यस्था धोक्यात येवू शकते. चोरीच्या गुन्ह्यातील गुनेगारांचा तपास लावून त्या गुन्हेगारांना जेरबंद करून शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशा सूचना आ. काळे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाघचौरे, कृष्णा आढाव, सुनील शिलेदार, फकीर कुरेशी, कार्तिक सरदार, अशोक आव्हाटे, मनोज नरोडे, शैलेश साबळे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, एकनाथ गंगुले, विजय नांगरे, चंद्रकांत धोत्रे, आकाश डागा, शिवाजी कुर्‍हाडे, ऋतुराज काळे, आशुतोष देशमुख आदि उपस्थित होते.

व्यापार्‍यांच्या तक्रारीची दखल घ्या : आ. काळे

छोटे – मोठे व्यावसायीक आर्थिक अडचणीत सापडले आहे. प्रशासनाने व्यावसायीकांना रात्री 11 पर्यत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. तसेच व्यापार्‍यांना त्रास न देता त्यांच्या तक्रारीची दखल पोलिस प्रशासनाने घ्यावी असे आ. आशुतोष काळे यांनी सूचना दिल्या.

हेही वाचा

पुणे : स्कूल बसचे अनधिकृत पार्किंग ; मित्रमंडळ चौकात पिकअवरमध्ये वाहतूक कोंडी

काय! सुरवीन चावला कान्समध्ये सूर्यापेक्षा जास्त चमकताना पाहिली का?

Back to top button