

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील नेप्ती, निमगाव वाघा, खंडाळा गावच्या शिवारामध्ये सुरु असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पाच ठिकाणच्या गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. यामध्ये 6 लाख 32 हजारांच्या मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे. गावठी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायण, तयार गावठी हातभट्टी गावठी हातभट्टी तयार करण्यसाठी लागणारे साहित्य असा सहा लाख 32 हजारांचा मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला.
याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग, युवराज चव्हाण, शैलेश सरोदे, पोलिस नाईक सचिन वणवे, राहूल शिंदे, महेश भवर, गायत्री धनवडे, कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे, वैभव काळे, अनिल जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तालुका हद्दीत मटका, जुगार जोमात
नगर तालुका हद्दीत मटका, जुगाराचे अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, पोलिसांकडून केवळ दारू अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे. इतर अवैध धंद्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याकडे पोलिस अधिकारी कानाडोळा करताना दिसत आहेत. त्यामुळे दारू अड्ड्यांप्रमाणेच इतरही अवैध धंद्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
हे ही वाचा :