नगर : राहुरीतील 4 आरोपी जिल्ह्यातून हद्दपार | पुढारी

नगर : राहुरीतील 4 आरोपी जिल्ह्यातून हद्दपार

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा  :  राहुरी हद्दीतील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या 4 आरोपींना 18 महिन्यांसाठी अ.नगर जिल्ह्यातुन हद्दपार केले आहे. दरम्यान, चौघांना अटक केल्याची माहिती स.पो. निरीक्षक रामचंद्र करपे यांनी दिली. राहुरी पोलिस स्टेशन हद्दीत टोळीप्रमुख भारत भाऊसाहेब ढोकणे (वय 28 वर्षे, रा. बालाजी मंदिर जवळ, राहुरी, जि. अ. नगर), सदस्य ओमकार सुनील डहाळे (वय 23 वर्षे, रा. कोळीवाडा, राहुरी), स्वप्नील नामदेव कुसमुडे (वय 23 वर्षे, रा. मल्हारवाडी रोड, राहुरी), शिवा सुनील नागरे (वय 25 वर्षे, रा. भाग्यश्री हॉटेल पाठीमागे, राहुरी यांच्याविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवुन घातक हत्यार जवळ बाळगणे, मारामारी करून दुखापत करणे, एकत्र येत दरोड्याची तयारी करणे, धाक दाखवून लुटमार करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हा पो. अधिक्षक राकेश ओला, अप्पर पो. अधीक्षक स्वाती भोर, पो. अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेप्रमाणे राहुरी हद्दीमध्ये गुन्हे करणार्‍या आरोपींवरप्रतिबंधक कारवाईचे आदेश मिळाले होते.
आरोपींविरुद्ध 2 वर्षांकरिता हद्दपार करण्याकरिता पो. अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचा अहवाल प्राधीकरणाडे सादर केला होता. या अनुषंगाने जिल्हा पो. अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींना अ.नगर जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी (दि. 5 जुन) रोजी हद्दपार केल्याचा आदेश काढला.

नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी शशिकांत बाबुराव मिसाळ, गणेश साहेबराव लिहिणार, बबलु महादेव इरले, महादेव ब्रम्हा इरले यांना घरातून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई पो. अ. राकेश ओला, अप्पर पो. अधिक्षक स्वाती भोर, पो. अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पो. स्टेशनचे स. पो. नि. रामचंद्र करपे, पो.स.ई. धर्मराज पाटील, सज्जकुमार नारहेडा, पो.ना. खरात, अमित राठोड, पो. काँ. आजिनाथ पाखरे यांच्या पथकाने यशस्वी केली.

चार फरारांचा तपास लागला नाही..!
कोबिंग ऑपरेशन करुन, फरार आरोपी गजानन किसन आहेर, गौतम साहेबराव माळी, दिलीप गोपीनाथ बेरड, दत्तात्रय बारकु बर्डे (सर्व रा. राहुरी) यांचा (दि. 7 जुन) रोजी शोध घेतला असता ते सापडले नाही.

Back to top button