

श्रीगोंदा (नगर ) पुढारी वृत्तसेवा : खराब रस्त्यामुळे अपघात होणे साहजिकच आहे. पंरतु चांगल्या रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. आढळगाव ते हिरडगाव फाट्यादरम्यान काल (दि. 9) दिवसभरात पाच चार चाकी वाहनांचे अपघात झाले. या अपघातांत पाचजण जखमी झाले आहेत. आढळगाव फाटा ते हिरडगाव फाटा रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच झाले. काही भागात बीबीएम करून कार्पेटचा स्तर टाकण्यात आला. कोकणगाव फाटा ते हिरडगाव फाट्यादरम्यानचा रस्ता पूर्ण झाला आहे. रस्ता चांगला झाल्यामुळे वाहनाचा वेग साहजिकच वाढतो. पण नवीन कामामुळे रस्त्यावर असणार्या छोट्या खडीमुळे वेगात जाणारी वाहने घसरत आहेत. काल दिवसभरात पाच वाहने रस्त्यावरून घसरून रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली आहेत. या पाच वाहनांमधील पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
आढळगाव ते हिरडगाव फाट्यादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. कामाची गुणवत्ता चांगली असून, अशा कामाकडे बारकाईने लक्ष असते. नवीन रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहने घसरू शकतात. वाहनचालकांनी वाहन चालविताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन संबंधित अधिकार्यांनी केले.
साईडपट्टी भरलीच नाही
हिरडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास भुजबळ म्हणाले, एकाच दिवशी पाच अपघात झाल्याने नेमका काय प्रकार आहे, हे शोधणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कामात साईडपट्टी भरली न गेल्याने हे अपघात झाले असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :