

संगमनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी व आनंदवाडी या भागात असणार्या ताम कडा पाझर तलावाची दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी 49.91 लाख रुपये मंजूर झाले आहे. या पाझर तलावाच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ खा. सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते आज (दि. 10) होणार आहे अशी माहिती शिवसेना किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख रामभाऊ राहणे यांनी दिली संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी, चंदनापुरी तसेच हिवरगाव देवगाव आणि खराडी वाघापूर या शेतकर्यांची शेती या तामकडा पाझर तालावर अवलंबून आहे. पावसाळयात या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणी येत असते. परंतु या पाझर तलावाला सध्या गळती लागलेली आहे. त्यामुळे या तलावात पाणीच शिल्लक राहत नाही.
या तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शिवसेना किसान आघाडीचे जिल्हा प्रमुख रामभाऊ राहणे चंदनापुरी ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश राहणे आणि श्याम राहणे यांनी खा. लोखंडे यांच्याकडेपाठ पुरावा केला. त्यानंतर खा. लोखंडे यांनी या पाझर तलावाच्या दुरुस्तीच प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यांनी त्या निधीस मंजुरी देत तामकडा पाझर तलावाच्या दुरुस्ती साठी तसेच मजबुतीकरणासाठी 49.91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
तामकडा पाझर तलाव दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचा भूमिपूजन खा. लोखंडे यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता होणार आहे. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, किसान आघाडीचे जिल्हाप्रमुख रामभाऊ राहाणे, तालुका प्रमुख रमेश काळे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारीसाखर कारखान्याचे जनरल मॅनेजर प्रमोद राहणे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवा हन माजी उपसरपंच रोहिदास राहणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे, रमेश सरोदे, नितीन सरोदे, तृप्ती बोर्हाडे, सुरेश राहणे, भाऊसाहेव बोर्हाडे यांनी केले आहे.