पोलिस पाटलांच्या भरतीचा मुहूर्त कधी? | पुढारी

पोलिस पाटलांच्या भरतीचा मुहूर्त कधी?

शेवगाव तालुका (नगर )  : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील पोलिस पाटील भरती काही वर्षांपासून प्रतिक्षेत असून, 82 गावांच्या रिक्त पोलिस पाटीलपदासाठी आरक्षनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्याबाबत अद्याप कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. तर, सहा गावांत कोतवाल भरतीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे.

तालुक्यात 82 गावांच्या पोलिस पाटील पद काही वर्षांपासून रिक्त आहेत. तरीही नवीन भरतीस मुहूर्त सापडत नसल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. याबाबत शासनाकडे आरक्षणाचे मार्गदर्शन मागवण्यात आले; मात्र त्याची वाट पाहावी लागत आहे. मध्यंतरी याचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता; मात्र शासनस्तरावर याचा विचार होत नसल्याने ही प्रक्रिया मंदावली आहे. या रिक्तपदाने पोलिस प्रशासनास अनेक अडचणी येत असून, गावागावातील अनेक सुशिक्षित युवक या पदांसाठी इच्छुक असून, गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवण्यास पोलिसांना मदत करण्याबाबत त्यांना अपेक्षा आहे.

नुकताच रिक्त 7 पैकी 6 कोतवालपदाचा जाहीरनामा निघाला आहे. यामध्ये कोळगाव, जोहरापूर, आंतरवाली बुद्रूक, वाघोली (अराखीव) कांबी, आव्हाणे बुद्रूक या गावांचा समावेश असून, यासाठी कमीत कमी चौथी उत्तीर्ण असणार्‍या इच्छुकांचे 15 जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

भरण्यात येणारी पोलिस पाटील पदांची गावे
नागलवाडी, सालवडगाव, शेकटे बुद्रूक, आंदरे, वरुर खुर्द, शोभानगर, ढोरजळगावने, देवळाणे, घोटन, सुकळी, ढोरसडे, मलकापूर, पिंगेवाडी, सुळे पिंपळगाव, बेलगाव, खुंटेफळ, सेवानगर, विजयपूर, कोनोशी, बोडखे, दादेगाव, सोनेसांगवी, हिंगनगावने, देवटाकळी, दहिगावशे, शिंगोरी, घेवरी, आंतरवाली खुर्द, भाविनिमगाव, लाखेफळ, आंतरवाली बुद्रूक, वरूर बुद्रूक, लोळेगाव, मळेगावने, ढोरजळगाव शे, आव्हाणे बुद्रूक, वरखेड, शहाजापूर, आव्हाणे खुर्द, वाघोली, रावतळे, दहिफळ नवीन, गरडवाडी, कर्जत खुर्द, जोहरापूर, बर्‍हाणपूर, चेडेचांदगाव, मळेगावशे, मंगरूळ, आपेगाव, खडके, बाडगव्हाण, बालमटाकळी, खामगाव, रांजणी, मजलेशहर, मंगरूळ, कुरुडगाव, सामनगाव, आखेगाव डो., मुरमी, आखतवाडे, ताजनापूर, बक्तरपूर, वाडगाव, हातगाव, भायगाव, थाटे, निंबे, खरडगाव, कर्‍हेटाकळी, मुर्शतपूर, कोळगाव, शेकटे खुर्द, माळेगावने, कांबी, लखमापुरी, मुंगी, खानापूर, दिवटे, आंतरवाली खुर्द, शहापूर आदी.

Back to top button