पारनेर खरेदी-विक्री संघाला उर्जितावस्था आणू : खा. डॉ. सुजय विखे पाटील | पुढारी

पारनेर खरेदी-विक्री संघाला उर्जितावस्था आणू : खा. डॉ. सुजय विखे पाटील

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार कै.बाळासाहेब विखे पाटील, त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता खासदार म्हणून माझ्यावर पारनेरकरांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, तसेच खरेदी-विक्री संघाला उर्जितावस्थेत आणू, अशी ग्वाही खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

यावेळी राहुल शिंदे पाटील, विश्वनाथ कोरडे, सचिन वराळ पाटील, सुनील थोरात, विकास रोहोकले, दिनेश बाबर, दत्ता पवार, पंकज कारखिले, शिवाजी खिलारी, संदीप सालके, बाळासाहेब रेपाळे, मनोज मुंगसे, सुभाष दुधाडे,वसंत चौधरी, गोरख पठारे, बाबासाहेब चव्हाण यांच्यासह विजयी उमेदवार उपस्थित होते. खासदार डॉ.विखे म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून खरेदी- विक्री संघाला विविध योजनेंतर्गत निधी उपलब्ध करू, तालुका भाजप व शिवसेनेने एकत्रितपणे प्रचार यंत्रणा राबवून चांगले यश मिळविले.

सुजित झावरे यांच्याकडून चेकमेट

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार नीलेश लंके यांनी मतदारांना फेटे बांधून जेवण देत सर्व मतदारांना घेऊन मतदान घडून आणले. मात्र, हीच बाब मतदारांच्या पचणी पडली नाही. दुसरीकडे सुजित झावरे पाटील, राहुल शिंदे पाटील यांनी प्रतिष्ठानच्या यंत्रणेला चेकमेट दिला. त्यांना विश्वनाथ कोरडे, सचिन वराळ, सुनील थोरात, वसंत चेडे, युवराज पठारे, पंकज कारखिले दत्ता पवार सागर मेड, दिनेश बाबर आदींची साथ लाभली.

खरेदी-विक्री संघाची निवडणूक लोकप्रतिनिधींनी प्रतिष्ठेची केली होती. ते स्वतः व पदधिकारी मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. आम्ही मात्र प्रचार यंत्रणेवर जोर देत शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि सर्व उमेदवार निवडून आणेल. -राहुल शिंदे पाटील, युवा नेते

Back to top button