पाथर्डी : स्वत:ची विहीर खुली करत भागविली तहान | पुढारी

पाथर्डी : स्वत:ची विहीर खुली करत भागविली तहान

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे, प्रशासनाकडे पाण्याच्या मागणीचे प्रस्ताव सादर झाले आहेत. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, त्यावर उपाय म्हणून मोहोज देवढे ग्रामपंचायतीने झटपट निर्णय घेत ग्रामनिधीतून खर्च करत खासगी टँकर सुरू केला.परंतु पाणी आणायचे कोठून, हा प्रश्न निर्माण झाल्याने तुकाराम देवढे यांनी स्वत-तच्या विहीरीचे पाणी उपलबद्ध करून दिले..

पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष पाहता, पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी खासगी विहीर खुली करण्याचे आवाहन करीत ग्रामनिधीतून खर्च करण्यास प्रवृत्त केले. त्याला प्रतिसाद देत स्वत:ची चारा पिके वार्‍यावर सोडून तुकाराम देवढे यांनी स्वत:च्या विहिरीचे पाणी देऊ केल्यामुळे, मोहोज देवढे गावासाठी हा प्रश्न निकालात निघाला.

यावेळी तुकाराम देवढे यांच्यासह, शिवाजीराव देवढे, प्रेमचंद खंडागळे, रावसाहेब देवढे, पांडुरंग काटे, बद्रिनाथ देवढे, दत्तात्रय काटे, नानाभाऊ देवढे, शेखर देवढे, रामेश्वर काटे उपस्थित होते. तत्पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी राजेंद्र देवढे, भगवान गर्जे, संभाजी देवढे, भागीनाथ सोनवणे यांनी प्रशासकीय कार्यालयात जाऊन विशेष परिश्रम घेतले. बापूराव महारनोर यांनी नारळ वाढवून टँकरचे स्वागत केले. यावेळी गोविंद रुपनर, पंडित देवढे, एकनाथ वाकचौरे उपस्थित होते.

Back to top button