अहमदनगर : पारनेर खरेदी विक्री संघ भाजपच्या ताब्यात; महाविकास आघाडीचा दारुण पराभव | पुढारी

अहमदनगर : पारनेर खरेदी विक्री संघ भाजपच्या ताब्यात; महाविकास आघाडीचा दारुण पराभव

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील खरेदी विक्री संघाची निवडणूक निकाल जाहीर झाला असून त्यात भाजपने १५-० ने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. पहिल्यांदाच तालुक्यात भाजपला एवढे मोठे यश मिळाले आहे. पारनेर खरेदी विक्री संघाची निवडणूक यापूर्वी बिनविरोधात झाल्या होत्या. मात्र, यावेळेस प्रथमच ही निवडणूक दोन्ही बाजूने प्रतिष्ठेची केली गेली.

आमदार निलेश लंके यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घातले असल्याने बाजार समिती निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडी या निवडणुकीत एकतर्फी यश मिळविले असा जाणकारांचा अंदाज होता. परंतु, भाजपकडून महाविकास आघाडीला कडवे आव्हान दिले गेले. बाजार समितीतील दारुण झालेला भाजपचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी कार्यकर्त्यांसह खा.डॉ.सुजय विखे,  जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे जल व्यवस्थापन समितीचे सदस्य राहुल शिंदे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे भाजप तालुका अध्यक्ष सुनील थोरात माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे आदींनी या निवडणुकीसाठी व्यवरचना केली होती. तर महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके, माजी आमदार विजय औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यासह निलेश लंके प्रतिष्ठान व महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळींनी या निवडणुकीत लक्ष घातले होते.

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदारसंघातून – भाजपा प्रणित जनसेवा पॅनलचे विजय उमेदवार त्यांना मिळालेली मते – बाजीराव रामचंद्र अलभर ६९ प्रमोद बबनराव कावरे ७० सुनील बाळू पवार ६१ संग्राम बाळासाहेब पावडे ६९ सतीश राजाराम पिंपरकर ७२ दत्तात्रय राजाराम रोकडे ६४ गंगाधर भानुदास रोहकले ६४ प्रसाद भरत शितोळे ६३

वैयक्तिक मतदार संघ- शैलेश संपत औटी १२४ रघुनाथ माधवराव खिलारी१३९ महिला मतदार संघ कपबशी ज्योती संदिप ठुबे २१६ रेखा संजय मते २०६

इतर मागास प्रवर्ग – अण्णा बबन शिंदे २१० संदिप अंबादास भागवत १६०
भटक्या विमुक्त जाती जमाती – भाऊसाहेब महादु मेचे २०० अजित नामदेव सांगळे १६९

महिन्याभरापूर्वी झालेल्या बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने १८-० ने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामूळे खरेदी-विक्री संघाची निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज होता. मात्र, बाजार समिती निवडणुकीत सभापती उपसभापती निवडीत झालेली नाराजी खरेदी विक्री संघाच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button