संगमनेर मर्चंटस् बँकेची निवडणूक बिनविरोध; 58 वर्षांनंतर घडला इतिहास | पुढारी

संगमनेर मर्चंटस् बँकेची निवडणूक बिनविरोध; 58 वर्षांनंतर घडला इतिहास

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : व्यापारी बांधवांसह सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या संगमनेर मर्चंटस् बँकेसाठी अर्ज माघारी घेण्याच्या शुक्रवारी (दि. 2 जून) शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. उद्योगपती राजेश मालपाणी यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याने बँकेच्या 58 वर्षात निवडणूक पहिल्यांदा बिनविरोध करण्यात यश आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगरसह नाशिक, पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर मर्चंटस् बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात मालपाणी परिवारासह सभासद, हितचिंतक सचालकांना मोठे यश आले आहे. काल शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक बिनविरोध करण्याकरीता उद्योगपती राजेश मालपाणी हे प्रयत्न करत होते. याकरीता रणनिती आखण्यात आली तिला यशही आले.

नगर, नाशिक व पुणे कार्यक्षेत्र असलेल्या या बँकेचे जवळपास 5 हजार सभासद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सभासद असून 18 मे रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. 19 रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली , दिनांक 2 जून रोजी पर्यंत अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. तर 5 जून रोजी निशाणी वाटप केले जाणार होते. तर 17 जून रोजी मर्चंटस् बँकेसाठी मतदान होणार होते. 18 रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र सर्वच व्यापारी बांधवांनी दाखविलेला विश्वास यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यावर सर्वांचे एकमत झाले.

यात पहिल्यांदा सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले असून छाननीत एकही अर्ज बाद झाला नाही. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. त्याला अपेक्षित यश आले. बँकेवर उद्योगपती संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांची सत्ता होती. आता त्यांचे सुपुत्र उद्योजक राजेश मालपाणी यांनी मर्चंटस् बँकेची धुरा आजतागायत यशस्वीपणे सांभाळली आहे. संजय मालपाणी, मनीष मालपाणी गिरिष मालपाणी साथ देत आहे.

शिवाय निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. संगमनेरच्या या महत्त्वाच्या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळला आहे. सत्ताधारी मंडळी आणि विरोधक सभासद यांचेत एकमत झाले. इतिहासात निवडणूक बिनविरोध झाली याचे श्रेय मालपाणी परिवार, सभासद, संचालक व विरोधकांनाही असून या निर्णयाने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांनी मन मोठे करत साथ दिली. यात विरोधकांनाही सामिल करून घेण्याचा मनाचा मोठे दाखविला आहे.

व्यापारी एकता पॅनल नवनिर्वाचित संचालक मंडळ – सर्वसाधारण मतदार संघ ः राजेश ओंकारनाथ मालपाणी, संतोष मोहनलाल करवा, प्रकाश सुरेश राठी, प्रकाश विश्वनाथ कलंत्री, संदिप (खेमू ) श्रीनिवास जाजू, संजय शंकरलाल राठी , वैभव सुनील दिवेकर, सम्राट शामसुंदर भंडार , महेश बिहारीलाल डंग, मधुसूदन सुभाषचंद्र नावंदर, मुकेश रमणलाल कोठारी, जुगलकिशोर जगदिश बाहेती.
इतर मागसवर्गीय मतदार संघ – रवींद्र रत्नाकर पवार. विमुक्त जाती भटक्या जमाती / विशेष मागासप्रवर्ग मतदारसंघ ः शाम विजय भडांगे.
महिला राखीव मतदार संघ – उषा किशोर नावंदर, किर्ती राजेश करवा. अनुसूचित जाती / जमाती मतदार संघ ः राजेंद्र कारभारी वाकचौरे असे विजयी उमेदवार आहेत.

गिरीष मालपाणी ठरले बाजीगर

निवडणूक बिनविरोध करण्यात यश येत असताना एक उमेदवार मात्र माघार घेण्यास तयार नव्हता. त्याची मनधरणी करण्यात आली. माघारीची वेळ संपत आल्याने सर्वांच्याच नजरा त्याच्याकडे होत्या. उद्योगपती गिरिष मालपाणी यांनी पुढाकार घेत स्वतः त्याचेशी संपर्क साधून अगदी शेवटच्या क्षणी त्याचा अर्ज माघारी घेण्यात यश आले. त्यामुळे बाजीगर ठरले, अशीच भावना सर्वांनी व्यक्त केली.

Back to top button