अहमदनगर : नियमित शिक्षकांच्या वेतनातील त्रूटी अखेर दूर | पुढारी

अहमदनगर : नियमित शिक्षकांच्या वेतनातील त्रूटी अखेर दूर

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सन 2005 मध्ये नियमित झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सहावा वेतन आयोगातील वेतन निश्चीतीतील त्रुटी शासनाकडून दूर करण्यात आल्या आहेत. सन 2005 मध्ये नियमित झालेल्या शिक्षकांना मूळवेतन 11,170 ऐवजी 11,360 असे 1 जानेवारी 2006 लागू करण्यात आल्याची माहिती आदर्श बहुजन शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय काटकर यांनी दिली.

शिक्षकाची सहाव्या वेतन आयोगाची सुधारित वेतन निश्चिती करून या वेतन निश्चितीची पडताळणी लेखा विभागाकडून करण्यात आली. यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकूडझोडे, लेखाधिकारी महेश कावरे, योगेश आंबरे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, कुमार यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यामुळे शासनाकडून सन 2005 मध्ये नियमित झालेल्या प्राथमिक शिक्षकांना 14 वर्षानंतर न्याय मिळाला असून या शिक्षकांना 2006 ते 2015 या कालावधीतीतील वेतन फरकाचा लाभ होणार आहे. तरी सन 2005 मध्ये नियमित झालेल्या सर्व पात्र शिक्षकांनी सुधारित वेतन निश्चिती करून घ्यावी, असे आवाहन काटकर यांनी केले आहे.

याकामी आदर्श बहुजन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. त्यांच्या मार्गदर्शनातच आदर्श बहुजन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, एकनाथ व्यवहारे, आबासाहेब लोंढे, नवनाथ अडसूळ, भागवत लेंडे, अशोक नेवसे, बाळासाहेब पोळ, सुभाष भिंगारदिवे, बाळासाहेब मोरे, अनिल साळवे, संजय लाड ,प्रल्हाद वाकडे, राजेंद्र रोकडे, राजेंद्र कडलग, अशोक देशमुख, अविनाश बोधक, रामभाऊ गवळी, शिवाजी पटारे, राजेंद्र मेहेरखांब, संतोष शिंदे, मच्छिंद्र तरटे, संजय बडे, दत्तात्रय गदादे, बापूराव खामकर, अशोक राऊत, मच्छिंद्र चिकने, देवराम लगड, सुभाष बगनर, अशोक राऊत, परिमल बनसोडे, दिलीप खराडे, राजेंद्र गागरे आदींचे योगदान लाभल्याचेही काटकर यांनी आवर्जून सांगितले.

Back to top button