अहमदनगर : अहिल्यादेवी होळकर जयंतीचे सर्वांना निमंत्रण : आ. राम शिंदे | पुढारी

अहमदनगर : अहिल्यादेवी होळकर जयंतीचे सर्वांना निमंत्रण : आ. राम शिंदे

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सवाचे 31 मे 2023 रोजी आयोजन केले आहे. राजशिष्टाचार पाळून या सोहळ्यासाठी सर्वक्षीय आमदार व खासदारांना निमंत्रण दिले असून तशी पत्रिका छापली आहे. त्यामुळे कोणीही कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये. गतवर्षीसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. दर्शनसाठी येणार्‍या प्रत्येकाच्या स्वागत करण्यात येईल, अशी माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली.

शासकीय विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत हेाते. ते म्हणाले, अहिल्यादेवी जयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इंदौर येथील होळकर संस्थांचे राजे यशवंतराव होळकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार तसेच धनगर समाजातील सर्व विद्यमान आमदार व माजी आमदार, खासदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, 2017 पासून शासकीय जयंती उत्सव सुरू करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी पहिल्यांदा चौंडीत तेढ निर्माण झाली. तो तणाव पुन्हा होऊ नये म्हणून माझा प्रयत्न आहे. मिरवणुकीची मागणी ग्रामस्थांनी केली असे बोलले जाते. मात्र, तशी कोणतीही मागणी ग्रामस्थांनी केलेली नाही. चौंडीतील जयंती उत्सावाचा कार्यक्रम कर्जत-जामखेडचा नाही.कर्जत-जामखेड इंटिग्रेड संस्थेमार्फत 30 मे रोजी जयंतीचे कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जाते.

परंतु, महापुरूषाच्या जयंती अगोदर कार्यक्रम घेणे म्हणजे महापुरूषाची अवहेलना होईल. उलट त्यांनी वेगळा कार्यक्रम करण्यापेक्षा 31 मे जयंती उत्सवात सहभागी व्हावे. त्यामुळे सगळ्यांना निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही. चौंडी येथील विकासासाठी व उत्साहवासाठी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले आहे. आगामी काळात विकास कामांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे.

Back to top button