जामखेड : परवानगी नाकारली तरीही चौंडीत यात्रा : आ. रोहित पवार | पुढारी

जामखेड : परवानगी नाकारली तरीही चौंडीत यात्रा : आ. रोहित पवार

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृतसेवा : तालुक्यातील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शासकीय कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. परंतु चौंडीत यात्रा काढण्यावर ठाम असल्याचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आमदार पवार म्हणाले, अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त सकाळी इंदोर येथून आलेला हत्ती, घोडे, तसेच टाळकर्‍यांसमवेत ग्रामस्थांसह 31 मे रोजी सकाळी चौंडीत यात्रा काढण्यात येईल. तसेच भक्तांना महाप्रसादाचे वाटपासाठी मी दिवसभर तांबणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

तरीही ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काढणार्‍या यात्रेत सहभागी होणारच आहोत, आमचा शासकीय कार्यक्रमाला पाठिंबा आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी. दिली नाही तरी आम्ही यात्रा काढणार आहोत. शासकीय कार्यक्रऔमाअगोदर यात्रा संपेल असेही आमदार पवार यांनी सांगितले.

दरम्यान दि. 31 मे रोजी जयंतीनिमित्त होणार्‍या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजनाची पूर्व तयारी म्हणून अहिल्याबाई होळकर सभागृहात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यासाठी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात, कैलास वराट, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, प्रसाद ढोकरीकर, माजी सभापती राजेंद्र गुंड, विकास राळेभात, वैजीनाथ पोले, सरपंच आसाराम गोपाळघरे, विजयसिंह गोलेकर, काकासाहेब कोल्हे उपस्थित होते.

Back to top button