

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जिल्हा दौर्यावर मुक्कामी येत आहेत. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस गुरुवारी सकाळी 11 वाजता राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर गुरुवारी रात्री अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी थांबणार आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. राज्य सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी तसेच अंमलबजावणीत येणार्या अडचणीबाबत माहिती घेणार आहेत. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणकडे रवाना होणार आहेत. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या दुसर्या टप्प्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहाणार आहेत.