अहमदनगर : खुनातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

अहमदनगर : खुनातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नामदेव मामा ऊर्फ नामदेव केशव दराडे (वय 25 वर्ष, रा.गोळेगाव, ता.शेवगाव) याला न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांनी हा निकाल दिला. राहुरी-नगर रस्त्यावरील हॉटेल साक्षी येथे आरोपी नामदेव दराडे हा वेटर म्हणून कामाला होता. याच हॉटेलमध्ये मयत सोनू छत्री हा स्वयंपाकी म्हणून कार्यरत होता.

हॉटेलमधील काम पूर्ण झाल्यानंतर प्रमोद बापूसाहेब म्हसे हे घरी गेले व आरोपी व मयत हे दोघे हॉटेलमध्येच होते. 19 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी प्रमोद म्हसे यांना सोनू छत्री याचा खून झाल्याचा फोन आला होता. राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर प्रमोद म्हसे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी घटनेचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हॉटेलमधील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी विरोधात सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने राजेश त्रिमुखे यांनी काम पाहीले.

Back to top button