नगर: पाणी वळवून घेतल्यामुळे मारहाण; दोन दात पाडले | पुढारी

नगर: पाणी वळवून घेतल्यामुळे मारहाण; दोन दात पाडले

राहुरी (नगर), पुढारी वृत्तसेवा: ‘आमची पाणी देण्याची बारी असताना तुझ्या शेतीमध्ये पाणी वळुन का घेतले,’ असे म्हणत मच्छिंद्र ढेरे यांना तिघा जणांनी बेदम मारहाण करीत दोन दात पाडले. ही घटना राहुरी तालक्यातील केंदळ बुद्रुक येथे 15 मे रोजी घडली.

मच्छिंद्र मुरलीधर ढेरे, (वय 65 वर्षे, रा. केंदळ बुद्रुक ता. राहुरी.) येथे राहतात. त्यांच्या घराजवळच राजेंद्र पंढरीनाथ तारडे यांची शेती आहे. दि. 14 मे 2023 रोजी रोजी दुपारी मच्छिंद्र ढेरे यांचे राजेंद्र तारडे याच्या सोबत शेतीमधील पाणी देण्याच्या कारणावरुन वाद झाले होते. दि. 15 मे रोजी दुपारी 4 वाजे दरम्यान मच्छिंद्र ढेरे घरात असताना काहीजण तेथे आले. ‘तू आमची पाणी देण्याची बारी असताना पाणी वळुन का घेतले,’ असे म्हणत शिवीगाळ करत काठीने व लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून त्यांचे दोन दात पाडले. ‘पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला व तुझ्या मुलाला ठार मारु,’ अशी धमकी दिली. घटनेनंतर मच्छिंद्र ढेरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीवरून राजेंद्र पंढरीनाथ तारडे, ऋषीकेश राजेंद्र तारडे, अनिकेत राजेंद्र तारडे (सर्व रा. केंदळ बु. ता. राहुरी) या तिघांविरुद्ध मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Back to top button