शेवगाव : दंगेखोरांची पोलिसांकडून धरपकड; 112 जणांसह इतरांवर गुन्हे दाखल

शेवगाव : दंगेखोरांची पोलिसांकडून धरपकड; 112 जणांसह इतरांवर गुन्हे दाखल
Published on
Updated on

शेवगाव तालुका(नगर); पुढारी वृत्तसेवा : शेवगाव येथे झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी 112 जणांसह इतरांवर गुन्हे दाखल केले असून, 29 जणांंना अटक केली आहे. त्यांना दि.19 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अन्य आरोपींची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. पोलिसांच्या जादा तुकड्या दाखल झाल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, सोमवारी शहरात तणावपूर्ण शांतता होती.

पोलिसांच्या बेपर्वाईने घडली घटना

पोलिस प्रशासनाच्या बेपर्वाईने ही घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मागील दोन-तीन महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद, परशुमराम जयंतीनिमित्त चौकात व रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले झेंडे, कमानी व क्रांती चौकातील व्यासपीठ, तसेच डीजेचा दणदणाट यामुळे अनेक वेळा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावेळी काही समाजकंटकांवर कारवाई करण्याचे धाडस पोलिसांनीे केले असते, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे मत व्यक्त होत आहे. पुढील काळात मिरवणुकांना परवानगी देताना पोलिसांनी आयोजकांना जबाबदार धरावे व सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अटक 29 दंगेखोरांना पोलिस कोठडी

अटक करण्यात आलेल्या 29 दंगेखोरांना पाथर्डी न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि.19 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश एम. ए. बेंद्रे यांनी दिले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.शिवाजी दराडे यांनी बाजू मांडली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – इमरान दिलावर पठाण, इम्रान मुस्तफा पठाण, मुस्तफा मन्सूरखान पठाण, इम्तियाज ईस्माईल शेख, नईम इलियास सय्यद, सल्लाउद्दिन हशमोद्दीन शेख, रिजवान आयुब शेख, वसिम अल्ताफ शेख, मतीन युसूफ शेख, शब्बीर युसुफ जहागीरदार, सलीम फैय्याज शेख, फिरदोस फारूक पठाण, नदीन जाफर शेख, आरिज नजीर पठाण (सर्व रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव), बंडू मधुकर वाबळे (रा. वाबळे वस्ती, पैठण रोड, शेवगाव), राहुल नवनाथ कुसळकर, रोहित अशोक सुपारे दोघे (रा. वडारगल्ली, शेवगाव), सोमनाथ सतिष मोहिते, यासीर इस्माईल शेख, जावेद चाँद शेख (दोघे रा.गेवराई रोड, शेवगाव), अर्शद अहमद शेख (रा. सोनामिया वस्ती, शेवगाव), बापूसाहेब चंद्रकांत वाघ, बाबासाहेब दादू वाघमारे, हुसेन रहीम बेग (तिघे रा. इंदिरानगर शेवगाव), प्यारेलाल दस्तगीर शेख (रा.विद्यानगर शेवगाव), शमशोद्दीन कदीर सय्यद, रज्जाक कदीर सय्यद (दोघे रा. शास्त्रीनगर शेवगाव), कैलास भाऊराव तिजोरे (रा. पैठण रोड शेवगाव), अमर मुस्तफा शेख (रा.भगूर ता.शेवगाव).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news