नगरमधून अल्पवयीन 101 मुली बेपत्ता

File Photo
File Photo
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगरमधून अलीकडच्या काळात सुमारे 101 मुली बेपत्ता झाल्या आहेत. या घटनांचा सखोल तपास करून मुलींना पळविणार्‍या आरोपींना कडक शासन करण्याची मागणी रोटरी प्रियदर्शनी आणि रोटरी मेन क्लबने केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. रोटरी क्लबच्या सहाय्यक प्रांतपाल गीता गिल्डा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा अ‍ॅड.नीलमणी गांधी, रोटरी मेन क्लबचे अध्यक्ष पुरूषोत्तम जाधव व सदस्या उपस्थित होते. गीता गिल्डा म्हणाल्या, नगरमधून 101 मुली बेपत्ता होणे, ही खूप मोठी चिंताजनक बाब आहे. शहरात सातत्याने महिला व मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी बागडपट्टीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. यावर पोलिसांकडून काय कारवाई होत आहे? असा प्रश्न उपस्थित करून मुलींना पळवणार्‍या आरोपींना कडक शासन करण्याची मागणी त्यांनी केली. रोटरी क्लबने आता बेटी बचाव बेटी पढाव बरोबरच आता बेटी सुरक्षा हे अभियानही हाती घेतले आहे. अ‍ॅड.नीलमणी गांधी यांनी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबत कोणती कलमे लावली, पोलिसांचा तपास रिपोर्ट बरोबर आहे का, या संदर्भात पोलिस अधीक्षक ओला यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, यासाठी पोलिसांनी लक्ष ठेवावे, अशी विनंती त्यांनी केली. रोटरी मेन क्लबचे प्रेसिडेंट पुरुषोत्तम जाधव यांनी त्यांचे आभार मानले. रोटरी प्रियदर्शनी रोटरीच्या सदस्या शोभा भोगावत, लता भगत, संध्या पांडे, नीता देवराईकर उपस्थित होत्या.

तपास थेट पोलिस निरीक्षकांकडे
मुलींवरील अत्याचारातील आरोपी व पळवून नेणार्‍या आरोपीचा तपास लवकरात लवकर व्हावा, यासाठी पोलिस निरीक्षकांकडे हा तपास दिला जातो. आरोपींना कडक शासन व्हावे, यासाठी अ‍ॅट्रॉसिटी, 376 कलम अंतर्गत गुन्हा व पोस्को कायदा लावण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक ओला यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news