चार मंडलाधिकार्‍यांकडे नऊ मंडळांचा कारभार ; शेवगाव तालुक्यातील परिस्थिती

चार मंडलाधिकार्‍यांकडे नऊ मंडळांचा कारभार ; शेवगाव तालुक्यातील परिस्थिती
Published on
Updated on

रमेश चौधरी : 

शेवगाव (नगर )  : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यात महसूलचा विस्तार वाढला असून 2 मंडळे व 9 सजे वाढले आहेत. आता एकूण 8 मंडळे आणि 47 सजे झाले आहेत. मात्र कर्मचारी अपूर्ततेने 4 मंडलाधिकार्‍यांना 9 मंडळांचा आणि 25 तलाठ्यांना 47 सजांचा अतिरिक्त पदभार साभाळण्याचे आदेश पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी जारी केले आहेत. शासनाने राज्यात 3 हजार 165 नवीन सजे व 6 तलाठी सजांमागे 1 महसूल मंडळ या तत्त्वाप्रमाणे वाढीव तलाठी सजांकरिता 528 नवीन महसूल मंडळे स्थापनेस मान्यता दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात 202 वाढीव तलाठी सजे व 34 वाढीव महसूल मंडळांची संख्या निश्चित केली आहे. त्यामुळे शेवगाव तालुक्यात 2 मंडळे, तसेच 9 सजांची निर्मिती करण्यात आली आहे.

पूर्वी शेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, चापडगाव, बोधेगाव अशी 6 मंडळे होती. आता दहिगाव ने व मुंगी या दोन मंडळांची नव्याने भर पडली आहे. पूर्वी 38 तलाठी सजे होती. आता शेवगाव 2, शेवगाव 3, वडुले बु, भायगाव, रांजणी, कर्‍हेटाकळी, मुंगी 2, सुकळी, लखमापुरी या 9 सजांची भर पडली आहे.

शेवगाव महसूल मंडळात शेवगाव 1, 2, 3, वरुर बु, खरडगाव, ठाकुर निमगाव, आखेगाव ति, अमरापूर या तलाठी सजांमध्ये 17 गावांचा, भातकुडगाव मंडळात भातकुडगाव, जोहरापूर, वडुले बु, सामनगाव, भायगाव तलाठी सजांत 10 गावे, दहिगाव ने मंडळात दहिगाव ने, भाविनिमगाव, शहरटाकळी, रांजणी, देवटाकळी तलाठी सजात 11 गावे, ढोरजळगाव शे मंडळात ढोरजळगाव शे, ढोरजळगाव ने, आव्हाणे खु, निंबे, वाघोली तलाठी सजात 14 गावे, एरंडगाव मंडळात एरंडगाव, दहिफळ, खानापूर, घोटण, खुंटेफळ, कर्‍हेटाकळी तलाठी सजात 17 गावे, चापडगाव मंडळात राक्षी, चापडगाव, आंतरवाली बु, ठाकुर पिंपळगाव, गदेवाडी, कोळगाव तलाठी सजेत 16 गावे, मुंगी मंडळात मुंगी 1, मुंगी 2, खडके, हातगाव, कांबी, लखमापुरी तलाठी सजेत 10 गावे, बोधेगाव मंडळात बोधेगाव, लाडजळगाव, राणेगाव, गोळेगाव, बालमटाकळी, सुकळी तलाठी सजेत 18 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

कामगार तलाठी व मंडळाधिकारी पदांची कमतरता पाहता मंडळाधिकारी ए.जी. शिंदे यांच्याकडे भातकुडगाव, दहिगाव ने, ढोरजळगाव मंडळाचा बी. आर. खुडे यांच्याकडे चापडगाव, मुंगी, बोधेगाव मंडळांचा पदभार देण्यात आला असून, ए. व्ही. बडे यांच्याकडे शेवगाव मंडळाचा व व्ही. व्ही. खुडे यांच्याकडे एरंडगाव मंडळाचा पदभार सोपावला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news