नगर : सुप्रीम निकालानंतर ठाकरे शनीचरणी

नगर : सुप्रीम निकालानंतर ठाकरे शनीचरणी

सोनई (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : सोळा आमदार अपात्रतेच्या सुप्रीम कोर्ट घटनापीठाच्या निकालाच्या दुसर्‍याच दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनी शिंगणापुरात धाव घेत मनोभावे दर्शन घेतले. ठाकरे यांनी शनीला काय साकडे घातले असेल? यावर विविध तर्कविर्तक लढविले जात आहेत. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी भेटीनंतर उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शनीशिंगणापूर येथे पोहचले. शनी चौथर्‍यावर जात स्वतः हस्ते विधिवत तेल अर्पण करून उद्धव ठाकरे यांनी शनी दर्शन घेतले.

दर्शनानंतर शनीशिंगणापूर येथे अनेक परप्रांतीय भाविकांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. उपस्थित शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. शनीशिंगणापूर देवस्थानच्यावतीने पूर्णत्वास येत असलेल्या पानसनाला सुशोभीकरण प्रकल्पामुळे शनी शिंगणापूरच्या वैभवात भर पडणार आहे. तसेच शनिदेवाच्या दर्शनाने मनाला आत्मिक समाधान मिळाले, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ठाकरे यांनी शनी महाराजांचे दर्शन घेत काय साकडे घातले असेल? याविषयी तर्कविर्तक लढविले जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news