नगर : शेडच्या कामावरून एकास बेदम मारहाण | पुढारी

नगर : शेडच्या कामावरून एकास बेदम मारहाण

राहुरी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : सध्या शेडचे काम करू नका? असे का म्हणल्याचा राग आल्याने शिवाजी पोटे यांना लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे घडली. शिवाजी शंकर पोटे (वय 58, रा. मानोरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिवाजी शंकर पोटे यांच्या घरा शेजारी त्यांचे चुलत भाऊ अशोक हौशाबापु पोटे हे त्यांचे कुटुंबासोबत राहावयास आहेत. दि. 9 मे रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शिवाजी पोटे हे त्यांच्या घरासमोर असतांना तेथे आरोपी आले. ते शिवाजी पोटे यांना म्हणाले की, ‘तू काल आमचे शेडचे बांधकाम चालू असताना तेथील मजुरांना, शेडचे पोल आमचे शेतात येत आहेत.

त्यामुळे सध्या शेडचे काम करु नका’ असे म्हणून शिवीगाळ करायला सुरवात केली. तेव्हा शिवाजी पोटे त्यांना म्हणाले की, तुम्ही शिवीगाळ करू नका. असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी शिवाजी पोटे यांना लाथा बुकक्यांनी व लाकडी काठीने तसेच कुर्‍हाड मारून जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर भांडणात शिवाजी पोटे यांच्या गळ्यातील चैन गहाळ झाली आहे. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अशोक हौशाबापु पोटे, भारत अशोक पोटे, नवनाथ उर्फ पप्पू अशोक पोटे, लताबाई अशोक पोटे (सर्व राहणार मानोरी, ता. राहुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button