नगर : टंचाईग्रस्त गावांसाठी धावताहेत 9 टँकर | पुढारी

नगर : टंचाईग्रस्त गावांसाठी धावताहेत 9 टँकर

नगर : पुढारी वृत्तसेवा : उन्हाची तीव्रता वाढू लागली. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या देखील वाढू लागली. सध्या संगमनेर, अकोले व पारनेर तालुक्यांतील 9 गावे आणि 41 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील 17 हजार 659 लोकसंख्येला 9 शासकीय टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. संगमनेर तालुक्यातील 7 गावे आणि 19 वाड्यांसाठी 6 टँकर धावत आहेत. अकोले तालुक्यातील एक गाव आणि 10 वाडयांसाठी 2 तर पारनेर तालुक्यातील 1 गाव व 12 वाड्यांसाठी 1 शासकीय टँकर धावत आहेत. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकर सुरु करावेत, या मागणीचे प्रस्ताव दाखल होत आहेत.

Back to top button