नगर : मुख्याध्यापिकेचे दहा तोळ्यांचे दागिने लांबविले

नगर : मुख्याध्यापिकेचे दहा तोळ्यांचे दागिने लांबविले

संगमनेर शहर (नगर ): पुढारी वृत्तसेवा : सेवानिवृत्त मुख्याध्यापिकाच्या सुमारे 10 तोळे सोने चोरट्यांनी संगमनेर बसस्थानकातून लांबविले. घुलेवाडीतील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात राहणार्‍या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रजनी सूर्यभान सहाणे या सोमवारी आपल्या भाचीच्या लग्नाला सोनई (ता. नेवासा येथे जाण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता संगमनेर बसस्थानकात आल्या. त्यांची मुलगी पिंपळगाव कोंजेला येथून येणार असल्यामुळे ते तिची वाट पाहत थांबल्या होत्या. काही वेळानंतर त्यांची मुलगी अर्चना ज्ञानेश्वर कर्पे या बसस्थानकात आल्या. त्यानंतर त्या दोघी नाशिक-सोलापूर बसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत सहाणे यांच्या पर्समधील दागिन्यांचा डबाच लांबविला.

या डब्यामध्ये सुमारे 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे चार तोळ्यांचे गंठण, 90 हजार रुपये किंमतीचा तीन तोळे वजनाचा राणीहार, 60 हजार रुपये किंमतीची 2 तोळे वजनाची सोन्याची साखळी, 45 हजार रुपये किंमतीच्या दीड तोळे वजनाच्या दोन अंगठ्या आणि 400 रुपये मूल्यांच्या 2 चांदीच्या अंगठ्या असा एकूण 3 लाख 15 हजार 400 रुपयांचे दागिने असलेला डबाच अज्ञात चोरट्याने लांबविला आहे.
त्यामुळे संगमनेर बसस्था नकातून प्रवास करणार्‍या महिला प्रवाशांमध्येच भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सदर महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news