धक्कादायक ! अकरा वर्षांच्या गतिमंद मुलीवर अत्याचार | पुढारी

धक्कादायक ! अकरा वर्षांच्या गतिमंद मुलीवर अत्याचार

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अकरा वर्षांच्या गतिमंद मुलीवर 57 वर्षांच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (दि. 10) रात्री घडली. मुलीवर अत्याचार करत असताना परिसरातील नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोक्सोसह अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमान्वये आरोपीवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख शकील सजन (वय 57, रा.कुंभारगल्ली, बागडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलगी व काही मुले घराच्या मागील गल्लीत रात्री नऊच्या सुमारास खेळत होते. काही वेळाने काही लहान मुले पीडित मुलीच्या घरी आले व तिच्या आईला सांगितले, की ‘तुम्ही मागच्या गल्लीत चला, तुमच्या मुलीसोबत एक व्यक्ती काय करत आहे ते पाहा.’ त्यामुळे घरातील सदस्य लगेच तिथे गेले. एका दुकानाच्या जिन्याखाली आरोपी मुलीवर अत्याचार करत असल्याचे दिसून आले. काही जणांनी आरोपीला तेथेच पकडून ठेवले व पोलिसांना माहिती दिली. काही जणांनी आरोपीला चोपही दिला. पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे तपास करीत आहेत.

Back to top button