

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर महापालिकेच्या माध्यमातून शहरातील काही भागात शहर बससेवा सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण रोड परिसरात बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. स्थायी समितीने बससेवा सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, अद्यापि बस सुरू झाली नाही. ती बस तत्काळ सुरू करावी, अशी मागणी नगरसेवक सचिन शिंदे यांनी महासभेत केली.
शिंदे म्हणाले, कल्याण रोड परिसरात मोठी नागरी वसाहत आहे.
कामगार वर्ग देखील येथे राहत आहे. त्यांना दररोज शहरात काम करण्यासाठी यावे लागते. त्यासाठी मनपाची बससेवा सुरू होणे गरजेचे आहे. अभियंता परिमल निकम म्हणाले, मनपा बससेवेचा ठेकेदार यांना सूचना, पत्रव्यवहार, आणि कारवाईची नोटीस दिली आहे. तरी सुद्धा ठेकेदाराने ही बससेवा सुरू केली नाही.