पुणे-कानपूर रेल्वेला आता बेलापूरमध्ये थांबा! | पुढारी

पुणे-कानपूर रेल्वेला आता बेलापूरमध्ये थांबा!

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-कानपूर साप्ताहिक हॉलिडे सुपरफास्ट रेल्वेला बेलापूर रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आल्याची माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी दिली. श्रीगोड म्हणाले, गाडी नं. 01036 व 01038 पुणे- कानपूर सेंट्रल एक्स्प्रेस दर बुधवारी पुणेहून सकाळी 6.30 वाजता येईल. दुसर्‍या दिवशी सकाळी 7.10 वाजता कानपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर गुरुवारी सकाळी 8.50 वाजता निघेल. बेलापूर (श्रीरामपूर) येथे शुक्रवारी सकाळी 6.40 वाजता येईल. पुणे येथे दुपारी 12.00 वाजता पोहोचेल.

पुणे- दौंड कॉर्ड लाईन, अ.नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसाळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, विरांगणा, लक्ष्मीबाई जंक्शन व उरई या रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. बेलापूर रेल्वे स्टेशनवर हॉलिडेे एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी व सोलापूर पुणे विभागात कार्यालयाकडे केली होती. पुणे- कानपूर हॉलिडे एक्स्प्रेस 3 मे ते 14 जूनपर्यंत्त दर बुधवारी धावणार आहे.

प्रवाशांनी या रेल्वेमधून प्रवास करण्यास अग्रक्रम द्यावा, असे आवाहन संघटनेचे सेक्रेटरी अनिल कुलकर्णी यांनी केले. दरम्यान, प्रतिसाद मिळाल्यास भविष्यात सुरु होणार्‍या नियमित रेल्वेला थांबा मिळेल. पुणे- पाटणा गाडी नं. 01039 व 01040 (पाटणा या हॉलिडे एक्सप्रेसला थांबा दिला आहे. दर शनिवारी सकाळी 8 वाजता पुणे येथून ती निघेल. परतीच्या प्रवासात दानापूरहून दर सोमवारी सकाळी 6.30 वाजता निघेल. पुणे येथे 17-35 वाजता पोहोचेल.

टपरीया जबलपूर, करणी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रथागराज चौकी, प. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन बक्सद आणि आरा या महत्त्वाचे रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी प्रवासांची सोय उपलब्ध झाली आहे. तिच्या 28 फेर्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. 6 मे ते 17 जूनपर्यंत या साप्ताहिक रेल्वेचे नियोजन राहील. 01121 व 01122 पुणे-दानापूर अनारिक्षीत स्पेशल रेल्वे एप्रिल व मे मध्ये दर रविवारी दुपारी 4.15 वाजता सुटेल. बेलापूर येथे रात्री 8 वाजता येईल. परतीच्या प्रवासात दानापूरहून मंगळवारी 12.15 वा. सुटेल. बेलापूरला सकाळी 6.40 वाजता येेईल. पुणे येथे दु. 12 वा. पोहोचेल. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष डॉ. गोरख बारहाते, विठ्ठल कर्डीलेंनी केले आहे.

Back to top button