नगर : रांजणीकर आता मोबाईलच्या रेंजमध्ये ; बीएसएनएल टॉवरचे भूमिपूजन | पुढारी

नगर : रांजणीकर आता मोबाईलच्या रेंजमध्ये ; बीएसएनएल टॉवरचे भूमिपूजन

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील डोंगरी भागातील रांजणी येथे भारत दूरसंचार निगमच्या मनोर्‍याच्या कामाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे या गावात आता रेंज मिळणार असल्याने मोबाईलधारकांनी समाधान व्यक्त केले. रांजणी येथे मोबाईलच मनोरा नसल्याने अनेक वर्षांपासून मोबाईलधारकांना रेंज मिळत नव्हती. त्यामुळे या गावात मोबाईलवर संपर्क साधणे शक्य नव्हते. अनेक वर्षांपासून मोबाईल मनोर्‍याची प्रतीक्षा आता संपली आहे. मोबाईलच्या रेंजबरोबरच नेटही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या गावातील मोबाईल खणखणार आहेत.

मोबाईल रेंज व नेटअभावी ग्रामस्थांबरोबरच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. गावची ही समस्या लक्षात घेऊन माजी सरपंच दिलीप झिपुर्डे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात गावात मोबाईल रेंज उपलब्ध होण्यासाठी मनोर्‍याला मंजुरी आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार झिपुर्डे यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडे वारंपुरावा पाठपुरवा केल्यानंतर नुकतीच भारत दूरसंचार निगमने रांजणी गावात मनोरा बसलविण्यास मंजुरी दिली.

रांजणीच्या सरपंच लहानूबाई अरुण ठोंबे, उपसरपंच जनार्दन लिंपणे व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीही पाठपुरावा केला. या मनोर्‍याचे मनोर्‍यांचे नुकतेच माजी सरपंच दिलीप झिपुर्डे, सरपंच लहानूबाई ठोंबे, उपसरपंच जनार्धन लिंपणे, ग्रामपंचायत सद्स्य शिवाजी डरंगे, ङाऊराजे चेमटे, एकनाथ चेमटे, शिवाजी खोमणे, रावसाहेब लिंपणे, हनुमंत पोतकुले, नाथा डरंगे, भाऊसाहेब देवगिरे, भारत झिपुर्डेष लक्ष्मण गायकवाड, राजू ठोंबे, बाळासाहेब जरे, बाबा ठोंबे, सुभाष बारवेकर, नारायण लिंपणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चर अटेंड करण्यासाठी, ऑनलाईन माहिती शोधण्यासाठी, यूट्युब, फेसबुकचा अध्यापनात वापर करण्यासाठी, व्हाट्सअप चे मेसेज पाहण्यासाठी इंटनेटवरची नितांत आवश्यकता होती. परंतु नेटवर्क नसल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना दीड ते दोन किलोमीटर अंतरावर जाऊन आपल्या अभ्यासाचे तसेच इतर ऑनलाइनचे काम करावे लागत होते तसेच गावातील नागरिकांना, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळा, अंगणवाडी कर्मचार्‍यांनासुद्धा नेटवर्क नसल्याने कामांमध्ये अडथळे येत होते. नेटवर्क नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला. नेटवर्क पासून वंचित असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. आता मनोरा उभारून नेटवर्क मिळणार असल्याने ग्रामस्थांनी खासदार सुजय विखे व माजी मंत्री कर्डिले यांचे आभार मानले.

Back to top button