नगर : वकील संघाची ई-फायलिंग सेवा वकिलांसह पक्षकारांना कामकाज

नगर : वकील संघाची ई-फायलिंग सेवा वकिलांसह पक्षकारांना कामकाज
Published on
Updated on

पाथडी तालुका (नगर ) पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुका वकील संघातर्फे पाथर्डी न्यायालयाच्या वकील संघाच्या रूममध्ये ई-फायलिंग सेवा सुरू करण्यात आली. ई-फायलिंग सेवेचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश आश्विनी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी न्यायाधीश व्ही आय शेख, न्यायाधीश मयुरसिंह गौतम यांच्या उपस्थित होते. यावेळी पाथर्डी वकील संघाचे अध्यक्ष राणा खेडकर, उपाध्यक्ष वैजीनाथ बडे, सचिव प्रशांत भाबड उपस्थित होते. ई फायलईंगसाठी लागणारी कॉम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर व इंटरनेट सेवा इत्यादी वस्तू संघाने खरेदी केले आहेत.

न्या. बिराजदार म्हणाल्या, पाथर्डी वकील संघाचे कार्य प्रेरणादायी आहे. या सोप्या ई-फायलिंग प्रणालीमुळे वकिलांना व पक्षकारांना कामकाज करणे सोपे होईल. आपण सुट्टीच्या दिवशीही प्रकरण दाखल करू शकतो. पक्षकारांना न्यायालयातील आपल्या केसबद्दलची माहिती घरबसल्या मिळू शकते. गतीने न्याय मिळण्यासाठी मदत होईल.

न्या. शेख म्हणाले, या सेवेचा वकिलांनी जास्तीत जास्त वापर करुन न्याय प्रक्रियेत जलद गती आणण्यासाठी न्यायव्यवस्थेला सहकार्य करावे. ई-फायलिंगबाबत वकिलांना मार्गदर्शन शेख यांनी करुन प्रकरण कशी दाखल करायची त्याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखविले.
न्या. गौतम म्हणाले, नवनवीन डिजिटल प्रणालीचा चांगल्या पद्धतीने न्यायालयीन कामकाजात पाथर्डी वकील संघाने सहभाग घेऊन नव्या काळाची गरज ओळखून ई फायलिंग संकल्पना वकिलांनी आपल्यात रुजवत आदर्श काम हाती घेतलेे. समाज हा बदलत चालला असून आपण समाजासोबत चालले पाहिजे, इंटरनेट सेवेचा जास्तीत जास्त वापर आपण चांगल्या कामासाठी करावा.

जिल्ह्यात पहिलाच उपक्रम
ई-फायलिंगसाठी लागणारी सर्व अद्ययावत यंत्रणा पाथर्डी वकील संघाने उभी केली आहे. जिल्ह्यात हा एकमेव उपक्रम आहे. यातून न्यायालयीन कामकाजाला अधिक गतिमान होण्यासाठी चालना मिळणार आहे. पेपर विरहित कामकाज यातून होण्यास मदत होईल, असे पाथर्डी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड राणा खेडकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news