नगर : एसटी महामंडळाची लालपरी हाऊसफुल

नगर : एसटी महामंडळाची लालपरी हाऊसफुल

नगर : पुढारी वृत्तसेवा :  उन्हाळी सुटी आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत यामुळे जिल्ह्यातील लालपरी हाऊसफूल धावत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे. तारकपूर आगाराच्या दररोजच्या उत्पन्नात आता दीड ते दोन लाख रुपयांची भर पडत आहे. शिंदे -फडणवीस सरकारने एसटी महामंडळाची सेवा 75 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या व्यक्तींसाठी मोफत केली. त्यानंतर लगेच महिला प्रवर्गासाठी देखील प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देऊन महिलांना दिलासा दिला आहे. प्रवास भाड्यात सवलत मिळू लागल्याने महिलांना आणि वयोवृध्द व्यक्ती खासगी वाहनातून प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसस्थानकांत गर्दी वाढली आहे.

एप्रिल महिन्यात शाळांना सुटी लागली. लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसला प्रतिसाद मिळू लागला आहे. तारकपूर आगाराला दररोज सरासरी 7 लाख उत्पन्न मिळत आहे. सध्या उन्हाळी सुटी आणि लग्नसराई असल्यामुळे महिलांचा एसटी प्रवास वाढला आहे. त्यामुळे या आगाराला दररोज सरासरी साडेआठ ते नऊ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
'अष्टविनायक' विशेष बससाठी सवलत नाही

तारकपूर आगाराच्या वतीने अष्टविनायक दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येते. मात्र, या बस प्रवासासाठी कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही. त्यामुळे अष्टविनायक व इतर धार्मिक स्थळांसाठी सोडण्यात येणार्‍या बससाठी महिला आणि 75 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या व्यक्तींना पूर्ण प्रवासभाडे देऊन प्रवास करावा लागणार असल्याचे तारकपूर आगार प्रमुख अभिजीत आघाव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news