नगरमध्ये शेतीच्या वादातून एकास मारहाण | पुढारी

नगरमध्ये शेतीच्या वादातून एकास मारहाण

पारनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गटेवाडी येथे जमिनीच्या वादातून एकास दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली ही घटना काल (शुक्रवारी) सकाळी 10 वाजता घडली. याबाबत गटेवाडी येथील बाळासाहेब रामचंद्र ठाणगे (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मला विनाकारण का त्रास देता, असे विचारल्याने गिताराम पाटीलबा ठाणगे याने मी तुझा सावत्र भाऊ भाऊसाहेब ठाणगे यांची जमीन वाट्याने करण्याकरीता घेतली आहे.

त्यामुळे शेतात कूपनलिका सुरू करण्यासाठी जात असतो, असे म्हणून शिवीगाळ करून भाऊसाहेब ठाणगे व त्यांचा मुलगा महेश ठाणगे यांना बोलावून मला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व बांबूच्या दांडक्याने मारहाण केली. आई गोधाबाई या सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. मारहाणीच्या भीतीने विलास ठाणगे यांच्या घरी लपून बसले असता, आरोपींंनी विलास ठाणगे यांच्या घरी जाऊन तू त्याला बाहेर काढ नाही,तर तुझे तुकडे करू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून गिताराम पाटीलबा ठाणगे, भाऊसाहेब रामचंद्र ठाणगे, महेश भाऊसाहेब ठाणगे व रोहन गायकवाड यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला

Back to top button