नगर : शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे, खते द्या : आमदार बबनराव पाचपुते | पुढारी

नगर : शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे, खते द्या : आमदार बबनराव पाचपुते

काष्टी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : येत्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, कोणत्याही परिस्थितीत खतांची टंचाई भासू देऊ नये अशा सूचना आमदार बबनराव पाचपुते यांनी खरीप आढावा बैठकीत दिल्या. तालुक्यातील काष्टी येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस राजेंद्र नागवडे, प्रतिभा पाचपुते, अरूणराव पाचपुते, माऊली हिरवे, दिलीप रासकर, संतोष रायकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, तहसीलदार मिलिंद कुलथे, गटविकास अधिकारी राम जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, विभागीय वन अधिकारी एम. जी. कर्‍हाडे, उपविभागीय अभियंता एस. फडतारे, उपकार्यकारी अभियंता अनिल चौगुले, उपकार्यकारी अभियंता शरद गहाणडुळे, सहायक निबंधक अभिमान थोरात, तालुका विकास अधिकारी वसंतराव जामदार, मंडळ कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते, मंडळ कृषी अधिकारी शीतल आरू , वनपाल एच.डी. गारुडकर, वनपाल ए.आर. गावडे आदी उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी प्रास्ताविक केले. तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी खरीप पूर्व तयारी बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात राजेंद्र नागवडे, अरुणराव पाचपुते यांची भाषणे झाली. संदीप बोदगे यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी राम जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमात महाडीबीटी योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियानअंतर्गत तालुक्यातील शेतकर्‍यांना अनुदानावर ट्रॅक्टरचे वाटप आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

Back to top button