नेवासा-देवगड रस्त्याची झाली दुरवस्था | पुढारी

नेवासा-देवगड रस्त्याची झाली दुरवस्था

नेवासा(नगर); पुढारी वृत्तसेवा : नेवाशाहून श्रीक्षेत्र देवगडला जाण्यासाठी खलाल पिंप्री, मडकी मार्ग जवळचा आहे. या रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे. त्यामुळे भाविकांसह प्रवाशांचे होल होत आहेत. श्रीक्षेत्र देवगड रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शिर्डीहून आलेले भक्त पैस खांब, मोहिनीराजांचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र देवगडला जाण्यासाठी या मार्गाचीच निवड करतात, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत हा रस्ता डांबरी झाला होता.

वाढत्या रहदारीमुळे देवगडला येणार्‍या भाविकांना सुलभता व्हावी, म्हणून या रस्त्याची निविदा प्रसिद्ध होऊन आठ किलोमीटर लांबीचे हे काम साडेपाच मीटर रुंद करण्यात येत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये कार्यारंभ आदेश संबंधित ठेकेदाराला दिले असताना रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागही अनभिज्ञ असल्याचे जाणवते.

तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे एका बाजूने खोदकाम चार महिन्यांपासून करून ठेवले. काम करीत असताना रस्त्यालगत केबल टाकतो, त्या पद्धतीने अगदी अरुंद खोदकाम करण्यात आले. ज्यामध्ये रोडरोलर बसणे शक्यच नाही, काम चार महिन्यांपासून बंद असल्याने वरिष्ठांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भाविक करीत आहेत.

Back to top button