दुचाकीवरून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; सुदैवाने बालपणीचा मित्र बचावला

दुचाकीवरून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू; सुदैवाने बालपणीचा मित्र बचावला

Published on

कोपरगाव(नगर); पुढारी वृत्तसेवा : पोलिस नाईक यांना मोटार सायकलवरच हृदयविकाराचा झटका आल्याने मोटारसायकल खाली पडली. ही दुर्घटना शहरातील नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रासमोरील रस्त्यावर घडली. दरम्यान, जखमी पोलिसास हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना वाटेतच मृत्यू आला. या दुर्घटनेमध्ये सुदैवाने बालपणीचा मित्र मामा या अपघातातून बचावला. राजू तुकाराम चव्हाण (वय 44) असे मृत पोलिस नाईक यांचे नाव आहे. ते तालुका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते मूळचे रा. घुमटवाडी, (ता. पाथर्डी) येथील होत.

ही दुर्घटना बुधवारी रात्री 8:15 वाजेचे सुमारास पोलिस ठाण्यापासून हजार मीटर अंतरावर नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रासमोरील रस्त्यावर घडली. मृत पो. ना. राजू तुकाराम चव्हाण व मामा प्रेमदास तारू पवार, (वय 45) हे एस.टी. वाहक (रा. वागळुज, ता. आष्टी, जि. बीड) हे दोघे मोटार सायकलवरून जेवण करण्यास जात असताना पो. ना. चव्हाण यांनी मामा तारु यांना दुचाकीवरून खाली उतरविले.

'दोन मिनिटांत येतो,' असे सांगत मोटार सायकल पुन्हा मागे वळवून घेवून जाताना अचानक हृदय विकाराचा झटका आला. यामुळे त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने तिची गती कमी करून एका बाजुस झुकत ते खाली पडले. मामाने ताबडतोब औषधोपचारसाठी डॉ. मुळे हॉस्पिटल येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. मृत पो. ना. राजू चव्हाण यांचे मामा प्रेमदास तारू पवार यांनी शहर पोलिस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भरत एच.दाते, पुढील तपास करीत आहेत. कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व पोलिस कर्मचार्‍यांनी या अचानक झालेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

'राजा माणूस' म्हणून चव्हाण होते प्रसिद्ध

बुधवारी सायंकाळी मृत पोलिस नाईक राजू चव्हाण हे देर्डे फाटा येथील एका बेवारस प्रेताचा अंत्यविधी करून आले होते. यानंतर ते मामा (बालपणीचा मित्र) खूप दिवसांनी आल्याने त्यांना सोबत घेऊन बाहेर जेवणासाठी दुचाकीवरुन जात असताना ही दुर्घटना घडली. सहकारी पोलिसांमध्ये चव्हाण हे मनाने 'राजा माणूस' म्हणून प्रसिद्ध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news