नगर : स्पर्धेत चांगले खेळाडू घडतील : आ. संग्राम जगताप | पुढारी

नगर : स्पर्धेत चांगले खेळाडू घडतील : आ. संग्राम जगताप

नगर; पुढारी वृत्तसेवा : महावीर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून समाजामध्ये वेगळी परंपरा जोपासली जात आहे. सामाजिक बांधीलकीतून सर्वजण जोडले जातात या स्पर्धेला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. या स्पर्धेची उत्सुकता सर्वांना लागत असते चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे भगवान महावीर चषक स्पर्धेचे वाडिया पार्क येथे आयपीएलच्या धर्तीवर आयोजन केले आहे. या स्पर्धेतून चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.

वाडिया पार्क येथे आदर्श व्यापारी मित्रमंडळ व मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भगवान महावीर चषक स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमहापौर गणेश भोसले, मनपा महिला बालकल्याण समिती उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक विपुल शेटिया, माजी नगरसेवक संजय चोपडा, आशिष पोखरणा, राजेश भंडारी, विलास पोखरणा, सुभाष गांधी, विनोद गांधी, नरेंद्र बाफना, ऋषभ भंडारी, किशोर पितळे, राजेंद्र गांधी, अतुल शिंगवी आदी नागरिक उपस्थित होते.

माजी नगरसेवक संजय चोपडा म्हणाले, भगवान महावीर चषक स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना खेळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. नगर शहरातील सुमारे 300 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये चांगल्या विचाराची निर्मिती होत असते. ही स्पर्धा 26 एप्रिल ते 7 मेपर्यंत मोठ्या उत्साहात सुरू राहणार आहे. तरी नगरकरांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूचे आरोग्य सदृढ व निरोगी राहत असते. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. आभार प्रदर्शन व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ताथेड यांनी मानले.

Back to top button