नगर : व्यवसायाच्या माध्यमातून होतेय रोजगारनिर्मिती : आमदार जगताप

नगर : व्यवसायाच्या माध्यमातून होतेय रोजगारनिर्मिती : आमदार जगताप
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे झपाट्याने उपनगरे निर्माण होत आहे. या ठिकाणी नागरी वसाहती वाढत आहे. त्यामुळे व्यापारीकरण वाढत चालले आहे. त्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होत असते. सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनने एकत्र येऊन व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जाते. व्यापार्‍यांनी एकत्र येऊन असोसिएशनच्या माध्यमातून काम केल्यास प्रश्न मार्गी लागण्यास मदत होत असते. तसेच व्यावसायिकरणालाही चालना मिळाल्याने रोजगार निर्मिती झाली, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, मनपा सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक महेंद्र गंधे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक सुनील त्रिंबके, नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण, शशिकांत नजन, सहायक पोलिस निरीक्षक कैलास वाघ, उपनिरीक्षक समाधान सोळंके, असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष भोजने, सचिव प्रमोद डोळसे, सहसचिव श्रीपाल कटारिया, खजिनदार केतन बाफना, यश शहा, मंगेश निसळ, शिवाजी मुंगसे, सचिन बाफना, विपुल छाजेड, प्रसाद कुलकर्णी, लक्ष्मीकांत चिकटे, रोहित पवार, आशिष कासार, विकास वामन आदी उपस्थित होते.

शिवाजी चव्हाण म्हणाले, की सावेडी उपनगर हे दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या परिसरातील नागरिकांना उपनगरामध्येच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशन प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही ऑनलाइन शॉपिंगच्या नादी न लागता आपल्या व्यापार्‍यांकडून खरेदी करावी. जेणेकरून आपल्या शहराला फायदा होईल असोसिएशनच्या माध्यमातून सभासदांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जात आहे. सर्वांनी एकत्रित येऊन सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे चांगले काम उभे करू, असे ते म्हणाले.

उपनगरात व्यवसायाला चालना

शहराच्या सर्वच उपनगरामध्ये बाजारपेठा निर्माण होत आहे. त्यामुळे शहरात रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. गुलमोहर रस्ता, पाईपलाईन, तपोवन, कुष्ठधाम, भिस्तबाग चौक ते महालापर्यंत रस्त्याची कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे व्यवसायीकरणही वाढले आहे, असे आमदार संग्राम जगताप म्हणाले.

संभाजीराजे कुस्ती केंद्रासाठी दहा लाख

पवननगर येथील छत्रपती संभाजीराजे कुस्ती केंद्रामध्ये चांगले खेळाडू निर्माण होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे दहा लाख रुपये किमतीची मॅट खेळाडूंना सराव करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भविष्यात नगर शहराला महाराष्ट्र केसरीचा बहुमान नक्कीच मिळेल, असे आमदार जगताप म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news