किसान सभा लॉन्ग मार्च : महसूल आणि आदिवासी मंत्र्यांची मागण्यांसंदर्भात चर्चा सुरू | पुढारी

किसान सभा लॉन्ग मार्च : महसूल आणि आदिवासी मंत्र्यांची मागण्यांसंदर्भात चर्चा सुरू

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या लॉन्ग मार्चतील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी कामगार यांच्या मागण्यांबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे किसान सभेच्या शिष्टमंडळाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहे. किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी असा लॉन्ग मार्च काल अकोले येथून निघाला आहे.  तो लॉन्ग मार्च भल्या पहाटे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे आला.

रामेश्वर मंदिरात हे सर्व आंदोलनकरते थांबले आहेत. दुपारी दीड वाजेच्या सुमारास यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे दोघे भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अजित नवले व इतर पदाधिकाऱ्यांशी शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या मागण्यांविषयी चर्चा करत आहे.

Back to top button