संगमनेर : बारसू प्रश्नी मंत्री काहीच बोलत नाही : आ. बाळासाहेब थोरात | पुढारी

संगमनेर : बारसू प्रश्नी मंत्री काहीच बोलत नाही : आ. बाळासाहेब थोरात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : कोकणाचा निसर्ग उद्ध्वस्त करणार्‍या बारसू रिफायनरीला विरोध करत असणार्‍या स्थानिक राहिवाशांवर पोलिसांनी दमदाटी सुरू केली आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू असताना मुख्यमंत्री सुट्टीवर गेले तर उपमुख्यमंत्री काहीच बोलण्यास तयार नसल्याची टीका काँग्रेसविधी मंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आ. थोरात म्हणाले की, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसच्या नावाखाली मागील आठवड्यात गोरगरीब आदिवासी समाजाच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठी हल्ला केला. काल अंधारात मुंबईतील आरे कॉलनीत असणारी शेकडो झाडे पोलीस बंदोबस्तामध्ये तोडली गेली. या दोन्ही घटना ताज्या असताना कोकणातील बारसू रिफायनरी प्रकरणी त्या भागातील जनतेने आंदोलन केले तर त्यांच्यावर सरकारने दडपशाही करण्याचे काम पोलिसांच्या मार्फत सुरू केले आहे.

या प्रकल्पात कुणाकुणाचे हितसंबंध अडकले आहेत? असा सवाल उपस्थित करून विकासाच्या नावाखाली जनतेला वेठीस करण्याचे काम सध्याचे शिंदे फडणवीस सरकार करत असल्याचा आरोप आ. थोरात यांनी केला. स्थानिक जनता जर रिफायनरीला विरोध करत असेल तर त्यांच्याशीसरकार चर्चा का करत नाही? असा सवाल आ. थोरात यांनी उपस्थित करून बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही केली.

Back to top button