रस्ताकामाची चौकशी करा; गोणेगाव -गोमळवाडीकर आक्रमक | पुढारी

रस्ताकामाची चौकशी करा; गोणेगाव -गोमळवाडीकर आक्रमक

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोणेगाव फाटा (चौफुली फाटा) ते गोमळवाडी रस्त्याचे डांबरीकरण तीन महिन्यापूर्वीच निकृष्ठ दर्जाचे काम झाले आहे. कमी जाडीचा डांबरीकरणारचा थर वापरून घाईघाईने डांबरीकरण उरकण्यात आले. साईड पट्ट्यांची सततची बोंबाबोंब कायम आहे. या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी होवून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे वरिष्ठांकडे केली.

निवेदनात म्हटले की, गोणेगाव फाटा (चौफुली फाटा) ते गोमळवाडी रस्त्याचे काम चालू असताना नागरिकांची सतत ओरड सुरू होती; पंरतु हेकेखोर ठेकेदाराने मनमानी रस्त्यावर कमी डांबर वापरून रस्ता पूर्ण केला. साईड पट्ट्या दुरुस्त नसल्याने अपघात होत आहेत.
रस्त्याचे काम सुरू असताना चौफुली जवळ नेवासा – पानेगाव डांबरी रस्त्यास गोमळवाडीकडे जाणार्‍या रस्त्याची व्यवस्थित जोडणी केली नाही, तसेच इतर ठिकाणी वाडीवस्त्यांसाठी रस्ते गेले आहेत. त्याठिकाणी व्यवस्स्थित रस्ता जोडणी केलेली नाही.

यामुळे डांबरीकरण लवकरच उखडणार आहे. ठेकेदारांना अनेक वेळेस सांगूनही रस्त्यांवरील डांबरीकरणाचा दर्जा सुधारलेला नाही. साईडपट्टीवर मुरूम टाकलेला नाही. काही दिवसांतच या रस्त्यांचे डांबरी खराब होऊन पुन्हा रस्ता खराब होणार आहे. शासनाचा रस्त्यांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर झाला आहे.

रस्त्याच्या इस्टीमेट प्रमाणे डांबरीकरण व साईड पट्टीचे मुरुमीकर करण्यात आलेले नाही. यामुळे रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा नियंत्रण विभागाने चौकशी करून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा गोणेगाव, गोमळवाडी ग्रामस्थांतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला.

Back to top button