राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालूक्यातील राहुरी खुर्द ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी गट मनमानी कारभार करीत आहे. केवळ सूडबुद्धीच्या राजकारणासाठी विकास कामांना अडथळे निर्माण करीत आहे, असा गंभीर आरोप करून नागरीकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
राहुरी खुर्द येथील 15 वित्त आयोगाच्या शिल्लक रकमेतून संजय हापसे घर ते लोखंडे यांच्या घरापर्यंत रस्त्या संदर्भात ग्रामपंचातीत ठराव केला आहे. सरपंच काही ग्रामपंचात सदस्यांसह ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे काही कामे होत नाही. मित्र परिवार अंगणवाडी ते वाकचौरे यांच्या घरांपर्यंत रस्त्या संदर्भात अनेकवेळा तक्रारी अर्ज निवेदने देण्यात आलेले असताना देखील ग्रामपंचायत मनमानी कारभार करून सदर कामे जाणूनबुजून करीत नाही. त्याच बरोबर संजीवनी वसाहत ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमणे करण्यात आली आहेत.
या संदर्भात परिसरातील महिलांनी सरपंच साखरे तसेच ग्रामसेवक चव्हाण यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. या प्रसंगी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. सदर घटनेचा निषेध करून सरपंच आणि ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मिना शिरसाठ, सुनिता मगर, कविता तोडमल, अर्चना गाडेकर, चंद्रकला हापसे, ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल, देवराम शिंदे, सुनिल तोडमल, राजु वेताळ, नितीन पाटील, अक्षय साळवे, चंदकांत कुलथे, सचिन मगर, योव्हान पाटोळे, शुभम कोकणे, अवि जाधव, अवि भालेकर, शुभम बारस्कर, योगेश तोडमल, अवि डोंगरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.