पारनेर : आम्ही एक झालो तेव्हाच समोरचे हरले : माजी आमदार विजय औटी | पुढारी

पारनेर : आम्ही एक झालो तेव्हाच समोरचे हरले : माजी आमदार विजय औटी

पारनेर; पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीची निवडणूक आपण जिंकणारच असून, हा आमदार नीलेश लंकेंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रात वलय निर्माण केले आहे. ते टिकविणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही ज्या दिवशी एक झालो, त्या दिवशीच समोरचे हरले, असेे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी केले.

बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार दौर्‍यानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. आम्ही आदेश मानणारे आहोत. वरून आदेश आला की, मार्केट कमिटीला त्यांच्या सोबत जायचे नाही, इकडे जमून घ्या. तो आदेश आम्ही पाळत आहोत. महाविकास आघाडी आहे, तोपर्यंत तालुक्यात एकत्र निवडणुका लढविल्या जातील. राज्यातील नेत्यांना अडचण नसेल तर आम्हाला देखील काही अडचण नाही, असे ते म्हणाले.

आमदार नीलेश लंके म्हणाले, निकालाची काळजी करू नका. आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर बहुमत मिळणारच आहे. बर्‍याच जणांना औटी आणि लंके कधीच एकत्र येऊ शकत नाही, असे वाटत होते. पण राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. निवडणुकीत बाह्यशक्तींला कायमचा धडा शिकवा. पाच वर्षांत मार्केट कमिटी आदर्शवत चालविण्याचे काम प्रशांत गायकवाड व त्यांच्या सहकार्‍यांनी यांनी केले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे, दीपक पवार, जयसिंग मापारी, विजय डोळ, विक्रम कळमकर, मारूती रेपाळे, प्रशांत गायकवाड, आबासाहेब खोडदे, बाबाजी तरटे, रामदास भोसले, संदीप सालके, अशोक सावंत, गंगाराम बेलकर, शंकर नगरे, जयसिंग मापारी, राहुल झावरे, सतीश भालेकर, कारभारी पोटघर आदी उपस्थित होते.

Back to top button