कोळपेवाडी : आरटीओ कॅम्पमध्ये लर्निंग लायसन्स द्या : आ. आशुतोष काळे | पुढारी

कोळपेवाडी : आरटीओ कॅम्पमध्ये लर्निंग लायसन्स द्या : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव येथे अनेक वर्षांपासून दर महिन्याला आर. टी. ओ. कॅम्प होत असल्यामुळे वाहन चालकांची मोठी सोय होत होती, परंतु श्रीरामपूरच्या परिवहन अधिकार्‍यांनी या कॅम्पमध्ये एप्रिल महिन्यापासून नवीन लर्निंग लायसन्स देण्याची सुविधा बंद केल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोपरगावात आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निंग लायसन्स देणेची सुविधा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी परिवहन आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

आ. काळे म्हणाले की, परिवहनमार्फत कोपरगावात दर महिन्याला आर.टी.ओ.चे 3 कॅम्प होतात. यातून लर्निंग लायसन्स, लायसन्स टेस्ट, रजिस्ट्रेशन व जुन्या वाहनांचे रिपासिंग आदी महत्त्वाची कामे झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती, परंतु श्रीरामपूर परिवहनकडून कोपरगावी होणार्‍या आर.टी.ओ.कॅम्पमध्ये नवे लर्निंग लायसन्स देण्याची सुविधा एप्रिलपासून अचानक बंद केली.

यामुळे वाहन धारकांना लर्निंग लायसन्स काढायचे त्यांना श्रीरामपूर येथे जाणे गैरसोयीचे होत आहे. यामुळे वाहनधारकांना होणार्‍या त्रासाची दखल घेऊन कोपरगावी होणार्‍या आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवे लर्निंग लायसन्स देण्याची सुविधा तातडीने पूर्ववत सुरू करण्यास संबंधित विभागास सूचना कराव्या, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी परिवहन आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Back to top button