अकोलेत पिचड विरुद्ध शेतकरी समृद्धी मंडळ | पुढारी

अकोलेत पिचड विरुद्ध शेतकरी समृद्धी मंडळ

अकोले; पुढारी वृत्तसेवा : अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पा. गायकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. दरम्यान, शेतकरी विकास मंडळाच्या 3 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. 15 जागांसाठी 34 उमेदवार निवडणूक रिंगणात निवडणूक लढवित आहेत.

अकोले बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीत मतदार हे सहकारी संस्थेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व नोंदणी झालेले हमाल, मापारी व व्यापारी हेच असल्याने निवडणुकीला उभे राहताना सर्वसामान्य शेतकर्‍याला निश्चितच विचार करावा लागला. या निवडणुकीत 15 सदस्य निवडले जाणार आहेत. 2,470 मतदार आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 159 अर्ज प्राप्त झाले होते. दि 6 ते 20 एप्रिल या कालावधीत अर्ज माघार घेण्यात आले. सहकारी संस्था सोसायटी मतदार संघातील 11, हमाल मापारी संघातुन 1, ग्रामपंचायत मतदार संघातून 4, व्यापारी मतदारसंघातून 2 एकूण 18 संचालकांसाठी निवडणूक होत आहे.

शेतकरी विकास मंडळाचे अधिकृत उमेदवार पुढील प्रमाणे – सोसायटी मतदार संघ – किरण प्रकाश देशमुख, सुनील रोहिदास रंधे, कैलास गंगाधर कानवडे, अशोक कारभारी उगले, रामनाथ नागु भांगरे, शिवनाथ विठ्ठल आरज, रावसाहेब विठ्ठल वाळुंज, इतर मागास प्रवर्ग – बाळासाहेब गणपत सावंत, महिला राखीव – नंदा सदाशिव कचरे, मंदा गणपत बराते, ग्रामपंचायत सर्वसाधारण – अर्जुन दत्तु गावडे, संतोष रामनाथ तिकांडे, दुर्बल घटक – केशव अर्जुन बोडके, व्यापारी मतदार संघ – अब्दुल मोहम्मद इनामदार, किरण हरिभाऊ कानकाटे, भटक्या विमुक्त जाती-जमाती- चक्रधर सदगीर (बिनविरोध), हमाल मापाडी मतदार संघ – मारुती परशराम वैद्य (बिनविरोध), अनुसूचित जाती- जमाती – तुकाराम सोमा खाडे (बिनविरोध) तर शेतकरी समृद्धी मंडळाचे मतदार संघ निहाय उमेदवार पुढील प्रमाणे – सोसायटी मतदार संघ – भास्कर बाळाजी खांडगे, राम बन्सी सहाणे, सचिन हौशिराम रंधे, ईश्वर सोमनाथ वाकचौरे, रुपा धोंडिबा कचरे, रोहिदास जिजाबा भोर, योगेश गजानन आरोटे, सोसायटी मतदार संघ- महिला राखीव – स्वाती तुकाराम कोरडे, मंगल अनिल भांगरे, इतर मागास प्रवर्ग – विकास आत्माराम बंगाळ, ग्रामपंचायत मतदार संघ – रामकृष्ण अण्णासाहेब आवारी, भाऊसाहेब पाडुरंग नाईकवाडी, दुर्बल घटक – भानुदास बोल्हाजी तिकांडे, व्यापारी मतदार संघ – मंगेश सुनिल नवले, नवनाथ नाना वाळुंज हे आहेत.

Back to top button