शिराढोणमध्ये दोन गटांत तूफान हाणामारी | पुढारी

शिराढोणमध्ये दोन गटांत तूफान हाणामारी

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : घरासमोरील दगड काढण्याच्या वादातून नगर तालुक्यातील शिराढोण शिवारात दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि.17) सकाळी घडली. दोन्ही गटांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये मारहाण, अ‍ॅट्रोसिटी कलमांचा समावेश आहे.

भाऊसाहेब नामदेव थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ तात्याबा वाघ, हरी मोहन वाघ व अरुण तात्याबा वाघ (सर्व रा. शिराढोण, ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले की, घराच्या पायर्याकरीता मुरूम टाकण्याचे काम करताना सोमनाथ तेथे आला. त्याने दगड काढण्यास सांगितले. फिर्यादीने त्याला कामात असल्याचे सांगून नंतर दगड काढतो, असे सांगितले. त्याचा सोमनाथला राग आल्याने त्याने इतरांच्या मदतीने भाऊसाहेबला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.

याप्रकरणी पोलिसांनी मारहाण, अ‍ॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर, सोमनाथ तात्या वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब थोरात, रोहित भाऊसाहेब थोरात, गौरव बबन थोरात, तुषार जाकू थोरात, बबलू पंडित थोरात, प्रदीप भगवान थोरात (सर्व रा. माळवाडी, शिराढोण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांनी फिर्यादीत म्हटले की, दुचाकीवर माळवाडी वस्तीतून सोलापूर रस्त्याकडे जाताना भाऊसाहेब थोरातला त्याच्या घरासमोर ठेवलेले दगडे काढून घेण्याचे सांगितले असता, त्याने शिवीगाळ करून इतरांच्या मदतीने मारहाण केली. जखमी वाघ यांनी नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button