सात वासरांना मिळाले जीवदान; श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा | पुढारी

सात वासरांना मिळाले जीवदान; श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : निरागस गोवंश वासरांना टेम्पोमधून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती अशोकनगर येथील शिवप्रहार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मिळाली. तत्काळ त्यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पथकास रवाना करून, तान्ही 7 निरागस वासरे व टेम्पोसह जावेद कुरेशी यास ताब्यात घेतले.

पो. हवालदार परदेशी, अहिरे, पवार, कारखेले व गोसावी यांनी ही कारवाई केली. रविवार (दि.16) रोजी दुपारी श्रीरामपूर शहरातील इंदिरानगर भागात बोरावके कॉलेजमागे काही त्यानंतर शिवप्रहार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पोलिस पथकाच्या सहकार्याने कत्तलीस जाणार्‍या टेम्पोसह एकास रंगेहात पकडले.

शहर पोलिसांनी टेम्पो (क्रमांक एम एच 04 जीएफ 8765) व 7 गोवंशय वासरांना ताब्यात घेतले आहे. एकुण 5. 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जावेद कुरेशीविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयपणे वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम यातील कलमाप्रमाणे कारवाई झाली आहे.

यावेळी शिव प्रतिष्ठान, श्रीरामपूरचे प्रमुख, गोसेवक किसन ताकटे, गणेश तरकसे व सहकार्‍यांनी तान्ह्या वासरांना दूध पाजले. किसन ताकटेंसह कार्यकर्त्यांनी तान्ह्या वासरांना संगमनेर गो शाळेमध्ये सुखरूपरीत्या पोहोच केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे.

Back to top button